निःशंक हो, निर्भय हो, मनारे
प्रचंड स्वामीबल पाठिशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तु गामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी  ॥ १ ॥

जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना काल ना नेई त्याला
परलोकिही ना भीती तयाला  ॥ २ ॥

उगाचि भीतोसि, भय हे पळू दे
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा
नको घाबरू तू असे बाल त्यांचा  ॥  ३  ॥

खरा होई जागा तू श्रद्धेसहीत
कसा होशी त्यावीण तू स्वामिभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ  ॥ ४ ॥

विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ
स्वामीच या पंच प्राणामृतात
हे तीर्थ घे, आठवी रे प्रचीती
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती  ॥ ५ ॥

॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
सहायता
Scan the code
KARMASU.IN
नमो नमः मित्र
हम आपकी किस प्रकार सहायता कर सकते है