हिंदू धर्मात सर्वच अमावस्या महत्त्वाच्या असतात परंतू दर्श अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी काही लोक व्रत देखील करतात. या दिवशी चंद्र दिसत नाही. कालसर्प दोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे. अमावस्येला अवस देखील म्हणतात.

दर्श अमावस्या पूजन विधी (Darsh Amavasya Pujan Vidhi)

पुराणांनुसार अमावस्येला स्नान-दान करण्याची परंपरा आहे. तसं तर या दिवशी गंगा-स्नान केल्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे, परंतू जी व्यक्ती गंगा स्नानासाठी जाऊ शकत नाही अशा लोकांनी जवळीक नदीत किंवा तलावात जाऊन अंघोळ करावी. हे देखील शक्य नसेल तर घरात अंघोळीच्या पाण्यात पवित्र नदीचं पाणी मिसळून अंघोळ करावी. आणि महादेव-

पार्वती आणि तुळशीची पूजा करावी.

दर्श अमावस्या महत्व

दर्श अमावस्येला व्रत करुन चंद्राची पूजा केल्याने चंद्र देवता कृपा करतात. सौभाग्य- समृद्धीचा आर्शीवाद देतात. चंद्र देव भावना आणि दिव्य अनुग्रहाचे स्वामी आहे. याला श्राद्धाची अमावस्या देखील म्हणतात. कारण या दिवशी पूर्वजांचे स्मरण केलं जातं. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी पूवर्ज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबाला आर्शीवाद देतात असे मानले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
सहायता
Scan the code
KARMASU.IN
नमो नमः मित्र
हम आपकी किस प्रकार सहायता कर सकते है